पहिल्या सामन्याआधी विराट कोहलीला मोठा धक्का; संघातील या खेळाडूला झाला करोना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, April 6, 2021

पहिल्या सामन्याआधी विराट कोहलीला मोठा धक्का; संघातील या खेळाडूला झाला करोना

https://ift.tt/31OHAbV
चेन्नई: आयपीएलचा १४वा हंगाम सुरू होण्याआधी आणखी एका खेळाडूला करोना व्हायरसची लागण झाली आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या नितिश राणा, दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेलनंतर आता संघाचा सलामीवीर याला करोनाची लागण झाली आहे. वाचा- देवदत्तने गेल्या वर्षी आरसीबीकडून सलामीवीर म्हणून खेळताना धमाकेदार फलंदाजी केली होती. आता विराट कोहलीला त्याच्या जागी अन्य फलंदाचा विचार करावा लागले. देवदत्त आयपीएलमधील किमान पहिले काही सामने खेळू शकणार नाही. देवदत्तच्या जागी संघात केरळच्या मोहम्मद अझरूद्दीनला संधी मिळू शकते. वाचा- देशांतर्गत स्पर्धेत गेल्या काही महिन्यात धमाकेदार फलंदाजी करणारा मोहम्मद अझरुद्दीन आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या लढतीत तो सलामीवीर म्हणून फलंदाजीला येऊ शकतो. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध ही लढत होणार आहे. या पहिल्या सामन्यात विराट कोहली सोबत अझर सलामीला दिसू शकतो. वाचा- देवदत्तने २०२० च्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. पण आता करोनामुळे तो किमान पहिल्या सामन्यासाठी तरी उपलब्ध असणार नाही. देवदत्तने १५ सामन्यात ३१.५३च्या सरासरीने ४७३ धावा केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीत त्याने सात सामन्यात १४७.४ च्या सरासरीने ७३७ धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉनंतर सर्वाधिक धावा करणारा देवदत्त होता. वाचा- देवदत्तच्या जागी अझरला संधी मिळू शकते. त्याने सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई विरुद्ध ५३ चेंडूत नाबाद १३७ धावा केल्या होत्या.