पेमेंट बँंकेचे खातेधारक आहात; रिझर्व्ह बँंकेच्या 'या' निर्णयाचा होणार तुम्हाला फायदा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 7, 2021

पेमेंट बँंकेचे खातेधारक आहात; रिझर्व्ह बँंकेच्या 'या' निर्णयाचा होणार तुम्हाला फायदा

https://ift.tt/3sYhLSK
मुंबई : डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्वाचा निर्णय आज रिझर्व्ह बँकेने घेतला. यामुळे देशातील पेमेंट बँका आणि त्यांच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 'आरबीआय'ने पेमेंट बँक खात्यातील दिवसअखेर शिल्लक (डिपॉझिट) मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी एक लाख रुपयांची मर्यादा होती. ( to Rs 2 lakh by ) केंद्र सरकारने ठेवींवरील विमा संरक्षण पाच लाख रुपयांपर्यंत वाढवल्यानंतर पेमेंट बँकांनी खात्यातील शिल्लक मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. त्यावर आज आरबीआयने पतधोरण जाहीर करताना निर्णय घेतला. ज्यामुळे पेमेंट बँकांना आता बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेत समान संधी मिळेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. परवानाधारक पेमेंट बँकांसाठी २७ नोव्हेंबर २०१४ रोजी जारी केलेल्या नियमावलीनुसार वैयक्तिक कर्जदाराला त्याच्या बँक खात्यात एक लाख रुपयांची शिल्लक ठेवण्याची परवानगी होती. मात्र पेमेंट बँकांच्या कामगिरीचा आढावा आणि ग्राहकांची गरज लक्षात घेत खात्यातील दैनंदिन शिलकीची मर्यादा एक लाखांवरून दोन लाख रुपये करण्यात आली असल्याचे आरबीआयने आज जाहीर केले. पेटीएम पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक या आघाडीच्या पेमेंट बँका सध्या कार्यरत आहेत. या बँकांकडून बचत खाते सेवा दिली जाते. ज्यात ग्राहकाला पैसे जमा करण्याची सुविधा आहे. मात्र पेमेंट बँकाकडून कर्ज दिली जात नाही. एटीएम/डेबिट कार्ड पेमेंट बँक इश्यु करतात मात्र क्रेडिट कार्ड देत नाहीत. ज्या ठिकाणी बँकिंग सेवा पोहोचली नाही अशा ठिकाणी पेमेंट बँकांना सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात खात्यातील शिलकीची मर्यादा वाढवल्याने लाखो पेमेंट बँक खातेदारांना फायदा होणार आहे.त्यांना आता मोठ्या रकमेचे डिजिटल व्यवहार करणे शक्य होणार आहे.