'सोलापूरचं एक थेंब पाणी इंदापूरला नेलं तर राजकीय संन्यास घेईन' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 26, 2021

'सोलापूरचं एक थेंब पाणी इंदापूरला नेलं तर राजकीय संन्यास घेईन'

https://ift.tt/3xmcLd3
प्रवीण सपकाळ । 'उजनी धरणातील पाण्याचे वाटप ठरल्याप्रमाणे होईल. सोलापूरकरांच्या हक्काचं एक थेंब ही पाणी इंदापूरला नेलं जाणार नाही. तसं झालं तर मंत्रिपद, आमदारकीचं काय, राजकीय संन्यास घेईन,' असा खुलासा सोलापूरचे पालकमंत्री यांनी केलाय. ( on ) वाचा: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीने उजनी धरणातून ५ टीएमसी इंदापूरला देण्यात आले. त्याच्या बातम्या समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविषयी प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्याला भरीस भर म्हणून विरोधीपक्ष भाजपने पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून रान उठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळं सर्वपक्षीय नेते, संघटना यांनी मंत्री भरणे यांच्याविरुद्ध आंदोलन छेडले होते. कुठे काळे झेंडे दाखविण्यात आले तर कुठे पालकमंत्री भरणे यांच्या प्रतिकात्मक पोस्टरची तिरडी यात्रा काढून पुतळ्याला जलसमाधी देण्यात आली. ही बाब पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांनी सावध पवित्रा घेत आपली बाजू स्पष्ट केली आहे. त्यामुळं उजनीच्या पाण्याचे नेमके गौडबंगाल काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कारण एका बाजूला खोरे निहाय पाणी वाटपाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम असताना आमदार भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साहाय्याने सांडपाण्याच्या नावाखाली अधिकचे ५ टीएमसी पाणी इंदापूर-बारामती पट्ट्यात नेलं आहे. त्यामुळं मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यातील टेलएन्डच्या तालुक्यांना उजनीचे पाणी पूर्ण क्षमतेने कधी मिळणार, याचं खरं उत्तर आता तरी कोणाकडे नाही. त्यामुळं आमदार भरणे यांच्या या छातीठोक खुलाशाची आता पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे. वाचा: वाचा: