नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे स्थिती चिंतेची ( ) बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ( ) आज 'मन की बात'मधून जनतेशी ( ) संवाद साधला. येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना करोनावरील लस देण्यात येणार ( ) आहे. सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावं. करोना संकटाच्या काळात लसीचं महत्त्व आता सर्वांना कळलं आहे. यामुळे लसीच्या बाबतीत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं म्हणाले. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने देश हादरला आहे. अशा या संकटाचा सामना करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण ठेवणं महत्त्वाचं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी अनेस आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा केली. यात लॅबमधील तंत्रज्ञ आणि फ्रंटलाइन वर्कर्शशीही पंतप्रधान मोदी बोलले आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला. गेल्या आपण करोनाच्या पहिल्या लाटेवर मात केली. पण दुसऱ्या लाटेने देश हादरला आहे. करोनावर मात करण्यासाठी आपल्याला आरोग्य तज्ज्ञ आणि त्यांनी दिलेल्या सूचांना प्राधान्य दिले पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. करोनाविरोधी लढाई जिंकण्यासाठी लस महत्त्वाची आहे. लसीकरण महत्त्वाचं आहे. पण लसीबाबत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचा मोफत पुरवठा केला जात आहे. करोनाच्या या संकटात केंद्र सरकार राज्यांना मदत करण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करत आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. देशात सुरू आहे. या लसीकरण मोहीमेत खासगी क्षेत्रानेही सहभाही व्हावं. खासगी क्षेत्रातील उद्योगांनी आणि कंपन्यांनी आपल्या कर्माचाऱ्यांचे लसीकरण करावे. तसंच मोफत लसीकरणाच्या फायद्यांबाबत राज्यांनी जनजागृती करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी, असं आवाहन मोदींनी केलं.