
मुंबई- दिवंगत बॉलिवूड अभिनेते आणि गायक किशोर कुमार यांच्या मुंबईतील घरात चोरी झाल्याची बातमी समोर आली. सुरक्षेत राहणाऱ्या कलाकारांच्या घरी चोरी होतेच कशी ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त किशोर कुमारच नाहीत तर बॉलिवूडचे इतर अनेक दिग्गज कलाकारांच्या घरांनादेखील चोरांनी आपलं लक्ष्य केलं आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर तर दिवसरात्र कडक पहारा असतो. परंतु, अशा कडक पहाऱ्यातूनही एक चोर बिग बींच्या घरात घुसला होता. त्या चोराने घरातून २५ हजार रुपये चोरले होते. परंतु, तो पळून जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. सोनम कपूरअभिनेत्री सोनम कपूर हिच्या घरून देखील तिचा एक महागातला हिऱ्यांचा हार चोरी झाला होता. सोनमने एका पार्टीत तो हार घातला होता. त्यानंतर तो चोरी झाला. त्याची किंमत पाच लाख रुपये होती. बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगन याच्याही घरी चोरी झाली आहे. अजयने त्यांच्या संपूर्ण घराच्या सफाईसाठी एका कंपनीतर्फे काही माणसं बोलवली होती. काम झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की घरातील पाच लाख रुपयांच्या १७ सोन्याच्या बांगड्या गायब होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्या सगळ्यांना अटक केली होती. अभिनेत्री सुष्मिता सेनच्या घरात चोरी झाली नसली तरी तिच्याबरोबर घडलेली घटना धक्कादायक होती. सुष्मिता फिरण्यासाठी ग्रीसला गेली असताना एअरपोर्टवरून तिचं सगळं सामान चोरी झालं होतं. अभिनेत्रीला फक्त अंगावरच्या कपड्यानिशी घरी परतावं लागलं होतं. शिल्पा शेट्टी शिल्पा शेट्टीने तिचं घर खूप महागड्या आणि अॅण्टीक वस्तुंनी सजवलं आहे. परंतु, एकदा चोराने तिच्या घरातील महागडा म्युझिक सिस्टीम आणि आयपॉड चोरून नेला होता. कतरिना कैफ अभिनेत्री कतरिना कैफ जेव्हा चित्रीकरण संपवून ऑस्ट्रेलियातून भारतात परतत होती तेव्हा तिचं सामान चोरी झालं होतं. तिची जी बॅग चोरी झाली होती त्यात ७२ लाख रुपये किमतीचे ८५ ड्रेस होते. खूप प्रयत्नानंतरही तिला ती बॅग परत मिळाली नाही.