शरद पवार होणं कोणाचंही काम नाही... कार्यकर्त्याचं ट्वीट व्हायरल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, April 2, 2021

शरद पवार होणं कोणाचंही काम नाही... कार्यकर्त्याचं ट्वीट व्हायरल

https://ift.tt/39zR52Z
अहमदनगर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, ते रुग्णालयात दाखल झाल्यापासून सोशल मीडियात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांचे नातू आमदार यांनी एका कार्यकर्त्याच्या भावना ट्वीट केल्या आहेत. एका कार्यकर्त्याने आपल्याला पाठविलेल्या या भावना शेअर करीत असल्याचे त्यांनी म्हटले असून पवारांच्या कार्याचे थोडक्या शब्दांत वर्णन करणारा हा संदेश चांगलाच व्हायरल होत आहे. वाचा: शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रोहित पवार यांनी एक ट्वीट केलं होतं. ‘साहेब, कोणताही त्रास तुमच्यासाठी किरकोळ असला तरी आमच्यासाठी तो मोठा असतो. लवकर बरं व्हा! सर्वांच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत! तुम्ही लवकर बरे व्हावेत म्हणून विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो,’ असं त्यांनी म्हटलं होतं. मधल्या काळात पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. पवार यांचे रुग्णालयातील वृत्तपत्र वाचनाचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले. तर दुसरीकडे पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारा मजकूरही व्हायरला झाला. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सायबर सेलकडे तक्रारही केली आहे. वाचा: हे सगळं सुरू असतानाच एका कार्यकर्त्याने व्हॉटसॅपवर पाठविलेला संदेश रोहित यांना चांगला भावला. त्यांनी तो ट्वीट केला असून त्याला भरपूर लाइक्स मिळत आहेत. पवार यांच्या जखमी पायांचा जुना फोटो वापरून या कार्यकर्त्याने संदेशात म्हटले आहे की, ‘या पायाच्या प्रत्येक रेषेला लागलेली आहे महाराष्ट्राच्या अक्षांश-रेखांशावरील माती. किल्लारीचा भूकंप असो की कोल्हापूरचा महापूर... संकटांच्या मानगुटीवर उभं राहून जनतेला दिलासा द्यायला हेच पाय धावले.. याच पायांना दररोज झाल्या कितीही जखमा... खांद्यावर आलं कितीही ओझं... तरी त्यांनी कधी केली नाही तक्रार...किती आले किती गेले, पण सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे. हे पाय आहेत जमिनीवरचे... आणि याच जमिनीतील मातीचा टिळा आहे भाळी. त्यामुळं आज दुखलेत, सुजलेत, रक्ताळलेत...पण थांबले नाही आणि थांबणारही नाहीत कधी... कारण या पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, जे कधीच आटणार नाही. शरद पवार होणं कुणाचंही काम नाही...! वाचा: