
मुंबई : कमॉडिटी बाजारातील अनिश्चिततेने आज सोने आणि चांदीला फटका बसला आहे. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीने आज सोने ३०० रुपयांनी तर चांदी १००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४७ हजारांखाली आली आहे. सोन्याच्या किमतीवर नफावसुलीचा दबाव निर्माण झाला आहे. आज सलग पाचव्या सत्रात झाली आहे. पाच सत्रात सोने १३०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज बुधवारी सोन्याचा भाव ४६९८३ रुपये असून त्यात ३०८ रुपयांची घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीचा भाव ६७८८१ रुपये असून त्यात १०५८ रुपयांची घसरण झाली आहे. वाचा : Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४७९० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४५७९० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९९० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०१७० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४६४० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८७०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४४० रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात देखील सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा भाव १७६७.७६ डॉलर प्रती औंस झाला आहे. त्यात ०.५ टक्के घसरण झाली आहे. चांदीचा भाव २६.२५ डॉलर आहे. कमॉडिटी विश्लेषकांच्या मते, आणखी काही काळ स्पॉट गोल्डचा भाव १७६० डॉलरवर राहील. दरम्यान, देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती बिघडत ( india coronavirus ) चालली आहे. ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याचा सामना राज्यांना करावा लागतोय. या सर्व स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज उच्चस्तरीय बैठक ( ) घेतली. या बैठकीत त्यांनी आरोग्य सुविधांचा आढावा ( ) घेतला. आरोग्य सुविधा वेगाने वाढवण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या या बैठकीत आरोग्य सुविधांसोबत ऑक्सिजन आणि औषधांच्या उपलब्धतेवर चर्चा केली.