इरफान खान यांना लागली होती मृत्यूची चाहूल; बाबिलने सांगितले काय होते त्यांचे अखेरचे शब्द - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 29, 2021

इरफान खान यांना लागली होती मृत्यूची चाहूल; बाबिलने सांगितले काय होते त्यांचे अखेरचे शब्द

https://ift.tt/3aPUM59
मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते यांनी २९ एप्रिल २०२० रोजी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाला आता १ वर्ष झालं आहे. पण त्यांचा मुलगा मात्र सोशल मीडियावर नेहमीच इरफान खान यांच्या आठवणी शेअर करताना दिसतो. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बाबिल खाननं वडील इरफान यांच्या बाबतीत एक खास गोष्ट शेअर केली. जे ऐकल्यानंतर सर्वच भावुक झाले. इरफान खान यांना त्यांचं निधन होणार आहे याची कल्पना आधीच आली होती.दोन वर्ष इरफान खान कॅन्सरवर उपचार घेत होते. पण या उपचारांनंतरही ते ठीक होऊ शकले नाहीत. त्यांच्या अखेरच्या काळात त्यांना कळून चूकलं होतं की, ते आता जास्त काळ जगू शकणार नाहीत. असं या मुलाखतीत इरफान खान यांचा मुलगा बाबिल खाननं स्पष्ट केलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बाबिल म्हणाला, 'मी बाबाच्या निधनाच्या २-३ दिवस अगोदर त्यांच्यासोबत रुग्णालयात होतो. अनेकदा शुद्ध हरपत असे. पण तरीही त्यांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. तेच त्यांचे अखेरचे शब्द ठरले. सुरुवातीला त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, 'मी आता मरणार आहे' त्यावर मी त्यांना म्हणालो तुम्हाला काही होणार नाही आणि यावर ते फक्त हसले आणि झोपून गेले' बाबिल खान लवकरच अनुष्का शर्माच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार होत असलेल्या 'काला' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. या चित्रपटात बाबिलसोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचं शूटिंग पूर्ण झालं आहे. इरफान खान यांचे चाहते बाबिलच्या या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.