भुकेलेले अस्वल जेव्हा हॉटेलमध्ये घुसते... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 29, 2021

भुकेलेले अस्वल जेव्हा हॉटेलमध्ये घुसते...

https://ift.tt/3aPBX1Z
बुलडाणा: अन्नाच्या शोधात असताना वाट चुकून जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसल्याच्या अनेक घटना अधूनमधून घडत असतात. पुण्यात अलीकडंच एक गवा मध्यवस्तीत दिसल्यानं लोकांची घाबरगुंडी उडाली होती. आता जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. येथे एक अस्वल अन्नाच्या शोधात चक्क हॉटेलात घुसल्याचं समोर आलं आहे. () बुलडाणा जिल्ह्यातील अस्वलासाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्यात अस्वलांची संख्या मोठी आहे. असेच एक अस्वल रात्री अन्नाच्या शोधात एका हॉटेलमध्ये आले. काही खायला मिळते का याच्या शोधात हे अस्वल असताना हॉटेलमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. वाचा: ज्ञानगंगा अभयारण्याला लागून आहे. या फाट्यावर धाबे व हॉटेल आहेत. यातीलच एका हॉटेलात अस्वल अन्नाच्या शोधात आले आणि हॉटेलच्या परिसरात असलेल्या भट्टीत शोधाशोध केली. त्यातून समाधान झाले नाही म्हणून हे अस्वल टेबलाकडे आले. टेबलाचा वास घेत त्याने चाटायला सुरुवात केली. त्याचवेळी टेबल खाली पडले आणि मोठा आवाज झाला. या आवाजाला घाबरून अस्वलाने धूम ठोकली. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. जंगलात पाणी नसल्याने अनेक प्राणी गावाकडे कूच करतात. वरवंड गाव फक्त ५० मीटर अंतरावर असून गावात रात्रीच्या सुमारास अशा हिंसक प्राण्याचा मुक्त संचार नेहमीच पाहायला मिळतो.