'दिवाळी भेट म्हणून परमबीर सिंगांनी सोन्याची बिस्किटे घेतली होती' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 28, 2021

'दिवाळी भेट म्हणून परमबीर सिंगांनी सोन्याची बिस्किटे घेतली होती'

https://ift.tt/2PwAtlW
म. टा. वृत्तसेवा, अकोला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांनी ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८दरम्यान अधिकारांचा गैरवापर करून कोट्यवधींचा रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप अकोल्याच्या नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक भीमराज ऊर्फ भीमराव घाडगे यांनी केला आहे. यासंदर्भातील पत्र घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक आणि एसीबीला पाठविले आहे. घाडगे हे तेव्हा कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत होते. (Allegations Against ) वाचा: घाडगे यांनी १४ पानांचे हे २० एप्रिल रोजी पाठविले आहे. या पत्रात त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. परमबीर सिंग हे ठाणे शहर पोलिस आयुक्त असताना त्यांनी पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला. फ्रान्सिस डिसिल्वा व प्रशांत पाटील या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना परमबीर सिंग यांची बेनाम संपत्ती कुठे आहे हे संपूर्ण माहिती असल्याचेही पत्रात उल्लेख आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात घाडगे यांनी २१ एकर शेत दुसऱ्याच्या नावे खरेदी केल्याचा दावाही केला आहे. यापूर्वी घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध २०१५ आणि २०१६मध्येही तक्रार केली होती. सोन्याच्या बिस्किटांचा गौप्यस्फोट परमबीर सिंग हे दिवाळीला भेट म्हणून प्रत्येक झोनच्या डीसीपीकडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याची बिस्किटे, सहायक पोलिस आयुक्त यांच्याकडून प्रत्येकी २० ते ३० तोळ्यांचे तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याकडून सुमारे ३० ते ४० तोळ्यांची सोन्याची बिस्किटे घेतली आहेत, असा दावा या पत्रात आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता राजू अय्यर या एजंटला ठेवले होते. अनेक श्रीमंत गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी त्यांनी दबाव आणला होता. तसे न केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे घाडगे यांचे म्हणणे आहे. पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांचादेखील यामध्ये सहभाग होता, असेही घाडगे यांनी पत्रात म्हटले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून परमबीर सिंग हे चर्चेत आहेत. या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू आहे. वाचा: