
नवी : दिल्लीतील परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह खोलीत बेडवर पडलेले होते. पतीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर दोन्ही मुलांची हत्या करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली, असा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, घराचा दरवाजा आतून बंद करण्यात आलेला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली. धीरज यादव असे मृताचे नाव असून, त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तो ३१ वर्षांचा होता. तो डीटीसीमध्ये बसचालक होता. तर आरती असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. ती २८ वर्षांची होती. तर मुलगा हितेन सहा वर्षांचा आणि अथर्व हा अवघ्या तीन वर्षांचा होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिथे पोहोचले. त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली. पंचनामा केल्यानंतर तपास सुरू केला. घटनेमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.