कच्चे तेल महागले ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 28, 2021

कच्चे तेल महागले ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधन दर

https://ift.tt/32S6d8b
मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आज सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाने ७१ डॉलर प्रती बॅरलपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा लावला होता. तब्बल १६ वेळा कंपन्यांनी इंधन दरवाढ केली होती. अमेरिकन कमॉडिटी बाजारात मंगळवारी ब्रेंट क्रूडच्या दरात ०.१० डॉलरची वाढ झाली. ब्रेंट क्रूडचा प्रती बॅरल ६६.५२ डाॅलर झाला. तर डब्ल्युटीआय क्रूडचा भाव ०.०६ डाॅलरच्या तेजीसह ६३ डाॅलरपर्यंत गेला आहे. कच्चे तेल महागल्याने पेट्रोलियम कंपन्यांवरील आयातीचा खर्च वाढला आहे.