
: जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन घालण्यात दलाला यश आले आहे. पोलिसांकडून अजूनही जंगल परिसरात शोध मोहीम सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा पोलीस ठाण्यावर बुधवारी मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावला होता. त्यानंतर नक्षलविरोधी पोलीस पथक जांभिया-गट्टा जंगल परिसरात शोध मोहीम राबवत होते. आज पहाटे या जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश मिळाले. अजूनही या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. २९ मार्च रोजी खोब्रामेंढा जंगल परिसरात नक्षली नेता भास्करसह पाच माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले होते. या घटनेनंतर नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला होता. नक्षलवाद्यांनी नुकतीच भारत बंदची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे रस्त्याच्या कामावरील सहा वाहनांची जाळपोळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर गडचिरोली पोलीस दलाने ही कारवाई केली आहे.