
मुंबई- ''बिग बॉस १४' चा रनरअप ठरलेला प्रचंड चर्चेत असतो. 'बिग बॉस १४' मध्ये सहभागी झाल्यापासून त्याच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. सोशल मीडियावरही त्याच्या फॉलोवर्सची संख्या लाखांमध्ये आहे. त्याच्या वाढलेल्या लोकप्रियतेचा फायदा त्याला '' मध्येही होताना दिसतोय. राहुल लवकरच चाहत्यांना 'खतरों के खिलाडी ११' मध्ये जबरदस्त टास्क करताना दिसणार आहे. आणि सूत्रांच्या माहितीनुसार, राहुलला 'खतरों के खिलाडी ११' मध्ये इतर स्पर्धकांच्या तुलनेत सगळ्यात जास्त मानधन देण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल 'खतरों के खिलाडी ११' च्या या सीजनचा सगळ्यात जास्त मानधन घेणारा स्पर्धक आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राहुलला प्रति एपिसोड १२ ते १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. इतर सहभागी खेळाडूंच्या मानधनाबाबत कोणतीही माहिती मिळाली नसली तरी राहुलला मिळणारी रक्कम इतर सहभागी स्पर्धकांच्या मानधनापेक्षा जास्त आहे. राहुल व्यतिरिक्त या कार्यक्रमात अर्जुन बिजलानी, अभिनव शुक्ला, सनाया ईरानी, वरुण सूद, दिव्यांका त्रिपाठी, महक चहल, आस्था गिल आणि विशाल आदित्य सिंह हे कलाकार सहभागी होणार आहेत. 'बिग बॉस १४' ची विजेती रुबीना दिलैकला देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आली होती परंतु, रुबिनाने त्यासाठी नकार दिला. तर दुसरीकडे राहुलला त्याची गर्लफ्रेण्ड दिशासोबत 'नच बलिये' साठी विचारणा करण्यात आली होती. परंतु, लग्नाचं कारण देत त्याने सहभागी होण्यास नकार दिला. राहुल आणि दिशा जून महिन्यात लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. परंतु, करोनाकाळात त्यांचं लग्न होईल का, याबाबत चाहत्यांना संभ्रम आहे. नुकताच राहुल आणि दिशाचा 'मधान्या' हा म्युजिक व्हिडीओ चाहत्यांच्या भेटीला आला होता. हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड पसंत पडला होता.