तरूण उद्योजकाची खुलेआम गोळ्या घालून हत्या, महिनाभरातील दुसरी घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 1, 2021

तरूण उद्योजकाची खुलेआम गोळ्या घालून हत्या, महिनाभरातील दुसरी घटना

https://ift.tt/3dr0zOX
गोरखपूर: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी इलेक्ट्रॉनिक्स दुकानदार शंभू शरण मौर्य आणि त्याचा कर्मचारी संजय पांडेय यांची गोळ्या घालून हत्या केली. बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. शंभू त्यावेळी दुकान बंद करत होते. निवडणूक वादातून त्यांची हत्या झाली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर लुटीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी, असेही बोलले जात आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप हत्येमागील कारण स्पष्ट समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गगहा परिसरातील कोठा गावातील रहिवासी शंभू मौर्य यांचे गगहा-जानीपूर रस्त्यावर सार्वजनिक आरोग्य केंद्राजवळ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. ते संध्याकाळी उशिरा दुकान बंद करून घरी जातात. मात्र, बुधवारी रात्र होईपर्यंत ते दुकानात थांबले होते. रात्री साधारण साडेआठच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी जाणार होते. तितक्यात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात खळबळ माजली. आजूबाजूच्या दुकानांचे शटर खाली खेचले गेले. घटनास्थळावरून हल्लेखोर लगेच पसार झाले. त्यानंतर लोक शंभूच्या दुकानाजवळ पोहोचले. शंभू आणि त्याचा कर्मचारी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तात्काळ दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला. हल्लेखोरांना लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महिनाभरात दुसरी घटना गगहा परिसरात महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. याआधी जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची तयारी करणारे माजी बसप नेते रितेश मौर्य यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. रितेश हत्याकाडांचा उलगडा करण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. तोच शंभूच्या हत्येने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. रितेश मौर्यचा जवळचा सहकारी होता शंभू गगहा परिसरात १० मार्च रोजी रात्री जिल्हा परिषद सदस्यपदाच्या निवडणुकीची तयारी करणारे रितेश मौर्य यांची गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शंभू हा त्यांचा जवळचा सहकारी होता. शंभूच्या हत्येचा संबंध रितेश मौर्यच्या हत्येशी जोडला जात आहे. दरम्यान, हत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. लवकरच आम्ही आरोपींना गजाआड करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.