धोक्याची घंटा! देशात आढळले ८१ हजारांवर नवीन करोना रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, April 2, 2021

धोक्याची घंटा! देशात आढळले ८१ हजारांवर नवीन करोना रुग्ण

https://ift.tt/3uff53o
नवी दिल्लीः देशातील करोना रुग्णांची वाढ ( ) अत्यंत झपाट्याने होत आहे. करोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी तब्बल १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ८१,४६६ ( ) आढळून आले आहेत. यासोबतच ४६९ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. केंद्र सरकारने करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाच्या मोहीमेला आणणखी वेग दिला आहे. अधिकाधिक नागरिकांना करोनावरील देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या २४ तासांत ३६,७१,२४२ नागरिकांवर लसीकरण करण्यात आले आहे. यापूर्वी मार्चमध्ये सर्वाधिक ३४.२८ लाख नागरिकांवर करोनाचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत एकूण ६,८७,८९,१३८ नागरिकांना करोनावरील लस देण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे ८१,४६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशाता आता करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ती ६,१४,६९६ इतकी झाली आहे. तर करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ११,५२५,०३९ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ५०,३५६ जण करोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या १,६३,३९६ इतकी झाली आहे.