नवी दिल्ली : देशात, मंगळवारी (२८ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख ६० हजार ९६० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या २९ लाख ७८ हजार ७०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. कालच्या २४ तासांत देशात तब्बल ३ हजार २९३ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर या दिवशी एकूण २ लाख ६१ हजार १६२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ०१ हजार १८७ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१
- उपचार सुरू : २९ लाख ७८ हजार ७०९
- एकूण मृत्यू : २ लाख ०१ हजार १८७
- करोना लसीचे डोस दिले गेले : १४ कोटी ७८ लाख २७ हजार ३६७