LIVE : पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यात मतदान सुरू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 29, 2021

LIVE : पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यात मतदान सुरू

https://ift.tt/2Qw4mDv
कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आज विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान ( ) होणार आहे. आज ३५ मतदारसंघांसाठी मतदान होणार असून २८३ उमेदवार रिंगणात आहेत. तर ८४ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचे बीरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष अनुब्रत मंडल यांना देखरेखीखाली ठेवलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ते आयोगाच्या देखरेखीखाली असतील. कारण मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्याविरोधात काही तक्रारी आल्या आहेत, असं आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. निवडणुकीच्या आधीच्या टप्प्यांमध्ये हिंसाचारात खासकरून चौथ्या टप्प्यात कूचबिहारमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. आजच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यात स्वतंत्र आणि निष्पक्ष मतदान होण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या ६४१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यातील २२४ कंपन्या या बीरभूम जिल्ह्यात तैनात आहेत. LIVE अपडेट : - पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात आलं आहे. 'आज बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडतंय. करोना प्रोटोकॉलचं पालन करत मतदारांनी मतदान करावं आणि लोकशाहीचाला आणखीन मजबूत करावा', असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. - अभिनेते आणि भाजपन नेते मिथुन चक्रवर्ती यांनी उत्तर कोलकाताच्या काशीपूर - बेलगाचिया इथल्या एका मतदान केंद्रावर आपलं मत नोंदवलं. 'या अगोदर मी एवढ्या शांतीपूर्ण पद्धतीने कधीही मतदान केलेलं नाही. सर्व सुरक्षादलांना यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो', असं मतदानानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलं. - बीरभूमच्या मतदान केंद्र क्रमांक १८८ मध्ये एक ईव्हीएम खराब झाल्यानं मतदानाला अर्धा तास उशिरानं सुरुवात झाली - सकाळी ७.०० वाजता मतदानाला सुरुवात मतदानादरम्यान करोनाच्या नियमांचे पालन गरजेचे मतदानादरम्यान करोनासंबंधी जारी करण्यात आलेल्या नियमांचे कडक पालक केले जाईल, असं अधिकाऱ्याने सांगितलं. दुसरीकडे पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १६४०३ नवीन रुग्ण आढळून आलेत.