
नवी दिल्ली : देशात शुक्रवारी १४ मे २०२१ रोजी साजरी केली जात आहे. याच निमित्तानं , तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासहीत अनेकांनी देशवासियांना दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा देतानाच ला मात देण्यासाठी नियम आणि दिशानिर्देशांचं पालन करण्याचा आणि देश-समाजाच्या भल्यासाठी काम करण्याचा सल्ला दिला आहे. 'ईद उल फित्र'चा पावन उत्सव रमजान संपन्न झाल्यावर बंधुभाव आणि सद्भावनेचा प्रसंग म्हणून साजरा केला जातो. स्वतःला मानवतेच्या सेवेकडे वळवण्याची आणि गरजूंचे जीवन सुधारण्याची संधी म्हणूनही ईद उल फित्र साजरा केला जातो. कोविड १९ महामारीच्या या काळात आपण सर्व नियम व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करून आणि समाज - देशाच्या भल्यासाठी काम करण्याचा आपण संकल्प घेऊ. या निमित्ताने मी सर्व देशवासीयांचे, विशेषकरुन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देतो' असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'ईद उल फित्रच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. मी सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. आशा आहे की सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी आपण या महामारीवर मात करू आणि मानवतेच्या कल्याणकारी कामांना पुढे नेऊ' असा संदेश पंतप्रधान मोदींनी दिलाय. तर, राहुल गांधींनी आपल्या संदेशात बंधुभावाचा संदेश दिलाय. 'अशा कठीण प्रसंगी एकमेकांना बंधुभावानं मदत करण हीच शिकवण प्रत्येक धर्म देत असतो. हीच आपल्या देशाची परंपरा आहे. आपणा सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा!' असं राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटलंय. दरम्यान, करोना संक्रमण काळात अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांनी आपल्या घरीच राहून नमाज अदा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही ईदच्या दिवशी आपल्या घरीच नमाज अदा केली. 'प्रत्येकाचं आरोग्य आणि सुरक्षेसाठी प्रार्थनेसोबतच ईदच्या शुभेच्छा. आपण केवळ निर्बंध आणि खबरदारीद्वारे भारत आणि संपूर्ण जगाला या महामारीतून मुक्त करावं लागेल' असं नक्वी यांनी म्हटलंय.