करोनाचा विळखा : देशात २४ तासांत ३.४३ लाख रुग्ण तर ४००० मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 14, 2021

करोनाचा विळखा : देशात २४ तासांत ३.४३ लाख रुग्ण तर ४००० मृत्यू

https://ift.tt/3eHSirQ
नवी दिल्ली : देशात घातल असलेलं थैमान आता हळूहळू ओसरताना दिसतंय. गेल्या काही दिवसांत करोना संक्रमित रुग्णांची संख्या थोडी कमी झालेली दिसतेय. शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (१३ मे २०२१) ३ लाख ४३ हजार १४४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात ४००० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ४० लाख ४६ हजार ८०९ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ६२ हजार ३१७ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत २ कोटी ०० लाख ७९ हजार ५९९ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३७ लाख ०४ हजार ८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ४० लाख ४६ हजार ८०९
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ०० लाख ७९ हजार ५९९
  • उपचार सुरू : ७ लाख ०४ हजार ८९३
  • एकूण मृत्यू : २ लाख ६२ हजार ३१७
  • करोना लसीचे डोस दिले गेले : १७ कोटी ९२ लाख ९८ हजार ५८४
देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १७ कोटी ९२ लाख ९८ हजार ५८४ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील २० लाख २७ हजार १६२ लसीचे डोस गुरुवारी देण्यात आले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, १३ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३१ कोटी १३ लाख २४ हजार १०० नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १८ लाख ७५ हजार ५१५ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात अर्थात गुरुवारी करण्यात आली. प्रत्येक दिवशी दाखल होणारी रुग्णसंख्या ४ मे : ३,५७,२२९ ५ मे : ३,८२,३१५ ६ मे : ४,१२,२६२ ७ मे : ४,१४,११८ ८ मे : ४,०१,०७८ ९ मे : ४,०३,७३८ १० मे : ३,६६,१६१ ११ मे : ३,४८,४२१ १२ मे : ३,६२,७२७ १३ मे : ३,४३,१४४ प्रत्येक दिवशीची मृत्यूसंख्या ४ मे : ३४४९ ५ मे : ३७८० ६ मे : ३९८० ७ मे : ३९१५ ८ मे : ४१८७ ९ मे : ४०९२ १० मे : ३७५४ ११ मे : ४२०५ १२ मे : ४१२० १३ मे : ४०००