
मुंबई: देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील अनेक राज्यात मृतांची संख्या इतकी मोठी आहे की अंत्यसंस्काराासाठी जागा कमी पडत आहे. झालेल्या रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन कमी पडत आहे. अशा परिस्थितीत काही जण आरोप प्रत्यारोप आणि राजकारण करत आहे. अशा लोकांना भारताचा माजी क्रिकेटपटू याने सनसणीत चपराक लगावली आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये इरफान म्हणतो, आज तुम्ही ज्या राजकीय पक्षासाठी भांडत बसला आहे. ज्यांना पाठिंबा देत आहात ते मृत्युमुखी पडलेल्यांना जिवंत करू शकत नाही. या पोस्टमध्ये इरफानने #IndianLivesMatter असा हॅशटॅग देखील वापरला आहे. वाचा- इरफानने हे ट्विट १२ मे रोजी केले आणि त्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोल करणाऱ्यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना रणौतचा देखील यात समावेश होता. ट्रोल करणाऱ्यांना इरफानने आज( १३ मे) आणखी एक ट्विट करत सनसणीत उत्तर दिले. वाचा- माझे सर्व ट्विट हे मानवतेसाठी किंवा देशावासीयांसाठीचे आहेत. मी भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्याच्यासाठी मी मत मांडतो. पण कंगना आणि पैसे देऊन अकाउंट चालवणाऱ्या लोकांकडून माझ्यावर टीका होत आहे. कंगनाने द्वेष पसरवल्याने तिचे अकाउंट बंद करण्यात आल्याचे इरफानने म्हटले आहे. वाचा- देशात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर अनेक क्रिकेटपटू मदतीसाठी पुढे आले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने १ कोटी रुपयांची मदत केली आहे. तर कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी ७ कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आयपीएलमधील काही संघांनी देखील करोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा समावेश आहे.