
नवी दिल्ली : करोनाविरुद्ध लढाईतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा भारतानं गाठलाय. गुरुवारी ''कडून (DCGI) भारत बायोटेकच्या '' लसीची २ ते १८ या लहान मुलांच्या वयोगटावर दिलीय. याअगोदर करोना लसीवर लक्ष ठेवणाऱ्या 'तज्ज्ञांच्या समितीनं' मंगळवारी २ ते १८ या वयोगटासाठी 'कोव्हॅक्सिन' या लसीच्या दुसऱ्या / तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलची शिफारस केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ''कडून ही ट्रायल ५२५ सदस्यांवर (volunteers) केली जाणार आहे. २ ते १८ वर्षांच्या मुलांवर केल्या जाणाऱ्या या 'कोव्हॅक्सिन' लसीच्या क्लीनिकल ट्रायलचा हा दुसरा आणि तिसरा टप्पा असणार आहे. ट्रायल दरम्यान लसीचा पहिला आणि दुसरा डोस २८ दिवसांच्या अंतरावर दिला जाईल. ही ट्रायल दिल्ली तसंच पाटण्याच्या एम्स तसंच नागपूरस्थित मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटसहीत आणखीही काही ठिकाणी पार पडेल, असं सांगितलं जातंय. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्था (CDSCO) च्या विषयक विशेष तज्ज्ञांच्या समितीनं मंगळवारी 'भारत बायोटेक'द्वारे करण्यात आलेल्या अर्जावर चर्चा-विनिमय करून लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता 'ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'नं परवानगी देत ट्रायलचा मार्ग मोकळा केलाय.