संतप्त नागरिकांनी लसीकरण केंद्राचा दरवाजा तोडला; जळगावात गोंधळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 12, 2021

संतप्त नागरिकांनी लसीकरण केंद्राचा दरवाजा तोडला; जळगावात गोंधळ

https://ift.tt/2RGYY0q
जळगाव: प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शहरात नव्याने सुरू झालेल्या केंद्रांवर आज मंगळवारी विस्कळीत नियोजनाचा फटका नागरिकांना बसला. मेहरूण येथील मुलतानी दवाखान्यात २०० ची क्षमता असताना एक हजाराचा स्लॉट काढण्यात आल्याने व ऐन वेळी इंटरनेट सेवा बंद पडल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला. तसेच चेतनदास मेहता रुग्णालय केंद्रावर लसींचा साठा न आल्याने संतप्त जमावाने प्रवेशद्वार तोडले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. लसीचे डोस प्राप्त झाल्यानंतर शहरात करोना लसीकरणासाठी नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यातील स्वाध्याय भवन व मुलतानी रुग्णालय या ठिकाणी केवळ १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होत आहे. जिल्ह्यात या वयोगटासाठी ही दोनच केंद्र असल्याने दोनशेच्या ऐवजी एका दिवसात प्रत्येक केंद्रांवर १ हजार स्लॉट काढण्यात आले होते. हे नियेाजन सोमवारी सायंकाळी उशिरा झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. तसेच चित्र मुलतानी रुग्णालयात दिसत होते. वाचा: चेतनदास मेहता रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा डोस असल्याने या ठिकाणी दुसरा डाेस घेणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी उडाली होती. पहाटे चार वाजेपासून या केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. या गर्दीमुळे गोंधळ उडाला होता. लसीचे पुरेसे डोस नसल्याने प्रशासनाचीही तारांबळ उडाली होती. यातच या केंद्रावर दरवाजाही तोडल्याचा प्रकार घडला. संतप्त नागरिकांची समजूत काढण्यासाठी महापौर जयश्री महाजन देखील केंद्रावर आल्यात. त्यांना देखील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शाहू महाराज रुग्णालयात गर्दी महापालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लस उपलब्ध असल्याने नेहमीप्रमाणे या केंद्रांवर गर्दी उसळली होती. दुसरा डोस असणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य दिले जात होते. यासह डी. बी. जैन रुग्णालयातही गर्दी उसळली होती. तसेच रोटरी व रेडक्रॉसच्या केंद्रांवर नियमित लसीकरण सुरू होते. वाचा: स्वाध्याय भवन येथे महानगरपालिका व जैन उद्योग समूह यांच्या सहकार्याने १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाला मंगळवारपासून सुरुवात झाली. सकाळी नऊ पासूनच स्लॉटनुसार या ठिकाणी नियोजन करण्यात आले होते. या ठिकाणचे नियोजन सुटसुटीत असून यामुळे गर्दी टाळत लसीकरण केले जात होते. यात पुरुषांसाठी स्वतंत्र दोन कक्ष व महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष अशा तीन कक्षांमध्ये लस दिली जात होती. वाचा: