वन नाइट स्टॅण्ड ते कंडोम जाहिरात, सनीच्या आयुष्यातले अनेक वादळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 15, 2021

वन नाइट स्टॅण्ड ते कंडोम जाहिरात, सनीच्या आयुष्यातले अनेक वादळ

https://ift.tt/2Rcla2N
मुंबई- बॉलिवूड प्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री आज चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. परंतु, पॉर्न इण्डस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करणं सनीसाठी मुळीच सोपं नव्हतं. कित्येक बॉलिवूड अभिनेत्रींनी सनीच्या बॉलिवूड पदार्पणाला विरोध दर्शवला होता. अनेक अडचणींचा सामना करत जराही न डगमगता सनीने बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली. बॉलिवूडमध्ये काम करून सनीला अनेक वर्ष झाली परंतु, या वर्षात अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे सनीला बोल लावले गेले. चित्रपट 'वन नाइट स्टॅण्ड' च्या प्रसिद्धीच्या वेळी एका मुलाखतीत सनीने केलेल्या वक्तव्यामुळे तिला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. सनीने म्हटलं होतं, वन नाइट स्टॅण्ड ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. सिंगल असताना सनीने देखील बऱ्याचदा असं केलं आहे. या वक्तव्यानंतर तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. याशिवाय सनीवर चित्रित करण्यात आलेली एक कंडोमची जाहिरात नवरात्रीच्या मुहूर्तावर गुजरातमध्ये लावण्यात आली होती. परंतु, त्या जाहिरातीला इतका प्रचंड विरोध केलं गेला की बऱ्याच परिसरातून जाहिरातीचे पोस्टर काढून टाकावे लागले होते. इतकंच नाही तर बंगळुरू येथील एका कार्यक्रमात सनीचा परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. परंतु, तेथील काही व्यक्तींनी या गोष्टीला विरोध करत स्वतःला जाळून घेण्याची धमकी दिली त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागला होता. सनीने २०११ साली डॅनियल वेबरसोबत लग्नगाठ बांधली. सनीने एका भारतीय मुलीला दत्तक घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर तिने दोन मुलांना जन्म दिला. सध्या सनी आपल्या कुटुंबासोबत केरळ येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.