मुंबई : एकीकडे करोनाचं संकट ()असताना दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळामुळे ( tauktae)भीषण परिस्थिती ओढावली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे देशात हाय अलर्ट आहे. यावर केंद्र सरकारचीही महत्त्वाची बैठक पार पडली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत ()यांनी पुन्हा एका केंद्रावर निशाणा साधला आहे. चक्रीवादळापेक्षाही या देशात जे कोरोनाचं वादळ निर्माण झालं आहे, ते थांबवणं गरजेचं आहे. या कोरोनाच्या वादळाने रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. त्यामुळे आधी याकडे लक्ष द्या अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि मोदींना डिवचलं आहे. इतकंच नाही तर लसीकरणासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना फोन टॅपिंग प्रकरणावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. देशांमध्ये कोणाचे फोन टॅपिंग होत नाही तेवढं सांगा. आमचेसुद्धा फोन टॅप झाले असतील आणि आतासुद्धा होत असतील असं संजय राऊत म्हणाले आहेत. फोन टॅप करणं आता राजकीय प्रकरण झालं असल्याचा घणाघातही यावेळी त्यांनी केला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ मध्ये फोन टॅपिंग करण्यात आले होते त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देत गंभीर आरोप केले आहेत. यावर फोन टॅपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा एक हत्यार आहे. मी नाना पटोले यांनाही सांगणार आहे की घाबरू नका ही काही मोठी गोष्ट नाही आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.