संकटातही साधली संधी; 'पदवीधर' तरुणांनी सुरु केला स्वतःचा व्यवसाय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 8, 2021

संकटातही साधली संधी; 'पदवीधर' तरुणांनी सुरु केला स्वतःचा व्यवसाय

https://ift.tt/3f1Sxx5
नांदेडः संपूर्ण देशावर करोना महामारीच्या संकटाने थैमान घातले असल्याने राज्यात करण्यात आल्याने अनेकांचा रोजगार हिरावला आहे. हातावर पोट असलेल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घरची आर्थिक स्थिती नाजूक असताना अनेक जण सध्या हतबल झाले आहे. पण नांदेडमधल्या दोन तरुणांनी लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात केली आहे. कोरोनामुळं सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळं सध्या अनेक उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. परिणामी अनेकांचे रोजगार गेले आहेत. बेरोजगारीची कुऱ्हाड अनेकांवर कोसळली आहे. पण, या परिस्थितीत खचून जाता लॉकडाऊनमुळं बेरोजगार झालेल्या दोन युवकांनी स्वतचा व्यवसाय सुरु केला आहे. खासगी रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी चहा, पोहे, उपमा, खिचडी यासारख्या नाश्त्याची सोय करून त्यांनी नवा व्यवसाय सुरु केला आहे. विशेष म्हणजे हे दोन्हीही तरुण पदवीधर असून त्यातला प्रकाश नरनवरे हा इंजिनिअर आहे. तर बालाजी पोकले याने बी. ए. पूर्ण केले आहे. दोन्ही तरुणांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोघेही नोकरीच्या शोधात असताना देशात लॉकडाऊन लागला. दोघांच्याही घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, घरची जबाबदारी आणि रोजची उपजीविका चालवण्यासाठी या दोन्हीही तरुणांनी पुढेकार घेत व्याजाने कर्ज काढून 'पदवीधर' या नावाने नाश्ता सेंटर सुरू केला. सुरुवातीला त्यांच्या या व्यवसायाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी शहरातील दत्तनगरच्या शेजारी असलेल्या डॉक्टर्स लेनमध्ये हे सेंटर सुरू केले. सध्या रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांची वाढती संख्या पाहता प्रकाश आणि बालाजी या दोघांना दररोज प्रत्येकी ५०० रुपये उत्पन्न मिळत आहे. मात्र, हतबल न होता जिद्दीने आम्ही थोडे थोडे पैसे जमवत हा व्यवसाय सुरु केलाय आणि आयुष्यात मोठं व्हायचं स्वप्न उराशी घेऊन आम्ही हा व्यवसाय करत असल्याची भावना दोघांनी व्यक्त केलीय. परिस्थितीला दोष न देता या दोन तरुणांनी इतर तरुणांना एक आदर्श घालून दिला आहे.