नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात एप्रिल महिन्याच्या अखेरच्या दिवशी अर्थात शुक्रवारी (३० एप्रिल २०२१) रोजी एकूण ४ लाख ०१ हजार ९९३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३५२३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल २ लाख ९९ हजार ९८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालायकडून देण्यात आलीय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ११ हजार ८५३ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३२ लाख ६८ हजार ७१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६
- उपचार सुरू : ३२ लाख ६८ हजार ७१०
- एकूण मृत्यू : २ लाख ११ हजार ८५३
- करोना लसीचे डोस दिले गेले : १५ कोटी ४९ लाख ८९ हजार ६३५