कोलकाता : पश्चिम बंगालच्या यांचा लहान भाऊ यांचं शनिवारी सकाळी निधन झालंय. जवळपास महिन्याभरापासून ते करोना संक्रमणाशी झगडत होते. असीम बॅनर्जी यांच्यावर कोलकाताच्या मेडिका सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मेडका रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. आलोक रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे लहान बंधू असीम बॅनर्जी यांचं आज सकाळी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झालं. ते करोना संक्रमित आढळले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते'. असीम बॅनर्जी यांच्यावर करोना प्रोटोकॉल अंतर्गत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आलीय. आज सकाळी असीम यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले परंतु, शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घतेला. पश्चिम बंगालची करोना आकडेवारी आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारपर्यंत १० लाख ९४ हजार ८०२ रुग्णांना करोनानं गाठलंय. यातील १ लाख ३१ हजार ७९२ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर ९ लाख ५० हजार ०१७ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत १२ हजरा ९९३ रुग्णांनी करोनामुळे प्राण गमावलेत.