ठाकरे सरकार ती धमक दाखवणार का?' केंद्र-राज्य वादावर मनसेचा सवाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 1, 2021

ठाकरे सरकार ती धमक दाखवणार का?' केंद्र-राज्य वादावर मनसेचा सवाल

https://ift.tt/2S9IsWS
मुंबई : देशातील इतर राज्यांसोबतच महाराष्ट्रातही करोनाचं (Coronavirus) संकट गडद झालं आहे. मात्र अशा स्थितीतही विविध मुद्द्यांवरून सतत केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. याच संघर्षावरून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं () नाराजी व्यक्त केली असून महाराष्ट्र सरकारला रोकडा सवाल केला आहे. 'जुनी म्हणं आहे भीक नको पण कुत्र आवर. आता म्हणावंस वाटतंय की लस नको पण भांडण आवर. केंद्र आणि राज्याच्या ब्लेम गेममध्ये जनतेचाच गेम होतोय. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे फक्त गाण्यातच म्हणायचं की तशी धमक महाराष्ट्र सरकार दाखवणार आहे? असो, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा,' असं ट्वीट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. दरम्यान, करोना काळात आरोग्य व्यवस्थेवरून राज्य आणि केंद्र सरकार वारंवार आमने-सामने येत आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्राला जबाबदार धरत आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. त्यावर उत्तर देत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पलटवार केला होता. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि लसी याबाबत केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येतो. त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्राच्या राजकीय संघर्षात जनतेला नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे, असं बोललं जातं. याबाबतच मनसेच्या संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र दिनी ट्वीट करत भाष्य केलं आहे.