पुण्यात खळबळ; तडीपार गुंडानं केला सहाय्यक फौजदाराचा खून - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 5, 2021

पुण्यात खळबळ; तडीपार गुंडानं केला सहाय्यक फौजदाराचा खून

https://ift.tt/3nMe3db
पुणे: वर्षभरापूर्वी तडीपार केलेल्या एका तडीपार गुंडानं फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ ही घटना घडली. या प्रकरणी गुंड याला अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रवीण महाजन याला एका वर्षापूर्वी तडीपार केले होते. तरीही तो शहराच्या मध्यवस्तीमध्ये आला होता. सहाय्यक फौजदार समीर सय्यद (वय ४८) हे काम संपवून खडक पोलीस लाइनमधील राहत्या घरी जात असताना श्रीकृष्ण टॉकीज जवळ त्यांच्यावर हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या खूनामागील कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीनं कारवाई करत पोलिसांनी महाजन याला ताब्यात घेतले. महाजन हा पोलिस रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर २० पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांनी आतापर्यंत त्याला दोनदा तडीपार केले आहे. सहाय्यक फौजदार समीर सय्यद बुधवार पेठेत महिलेचा खून या घटनेची माहिती घेत असतानाच बुधवार पेठेत एका महिलेचा खून झाल्याचे समोर आले आहे. राणी असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तिच्याबद्दल इतर माहिती मिळू शकलेली नाही. या खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. काही तासांच्या अंतरानं दोन खुनाच्या घटना समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे. वाचा: