लकी अली यांच्या निधनाची अफवा, मैत्रीण नफीसा यांनी सांगितलं सत्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 5, 2021

लकी अली यांच्या निधनाची अफवा, मैत्रीण नफीसा यांनी सांगितलं सत्य

https://ift.tt/2SvKD7D
मुंबई: सध्या देश करोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देत आहे. दरम्यानच्या काळात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचं करोना व्हायरसरमुळे निधन झालं आहे. अशातच बॉलिवूड गायक यांच्या निधनाच्या वार्ताही सोशल मीडियावर मंगळवारपासून दिसत होत्या. गायक लकी अली यांचं करोनाच्या संक्रमणानं निधन झाल्याचं बोललं जात होतं. ज्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजलीही दिली होती. पण ही निधनवार्ता खोटी असल्याचं त्यांची मैत्रीण यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबत त्यांनी लकी अली आपल्या कुटुंबीयांसोबत एकदम ठीक असल्याचंही म्हटलं आहे. गायक लकी अली यांच्या निधनाच्या अफवांनंतर इ-टाइम्सशी बोलताना नफीसा अली म्हणाल्या, 'मी आजच लकी अली यांच्याशी २-३ वेळा बोलले आहे. ते एकदम ठीक आहेत. त्यांना करोना झालेला नाही आणि सध्या ते आपल्या आगामी म्यूझिक कॉन्सर्टची तयारी करत आहेत. आम्ही आज त्यांच्या व्हर्चुअल कॉन्सर्टबद्दल बोललो. सध्या ते त्यांच्या कुटुंबासोबत बंगळुरूमध्ये आहेत आणि सर्वजण एकदम ठीक आहेत.' याशिवाय नफीसा अली यांनी एक ट्वीटही केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'लकी एकदम ठीक आहेत. त्यांना करोना झालेला नाही. ते आपल्या कुटुंबीयांसोबत असून दुपारीच माझं त्यांच्याशी बोलणं झालं असून त्यांची तब्येत एकदम ठीक आहे.' लकी अली सध्या सोशल मीडियावर फारसे चर्चेत नसले तरीही ९०च्या दशकात त्यांचे म्युझिक व्हिडीओ आणि गाण्यांनी जगभरात लोकप्रियता मिळवली होती. आताही अनेकदा त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आजही त्यांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे चाहते त्याच्या आगामी म्युझिक अल्बमची आतुरतेनं वाट पाहत आहेत.