नवी दिल्ली : सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात रविवारी (१६ मे २०२१) २ लाख ८१ हजार ३८६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ३ लाख ७८ हजार ७४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका दिवसात ४१०९ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ४९ लाख ६५ हजार ४६३ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ७४ हजार ३९० नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत २ कोटी ११ लाख ७४ हजार ०७६ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३५ लाख १६ हजार ९९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ४९ लाख ६५ हजार ४६३
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ११ लाख ७४ हजार ०७६
- उपचार सुरू : ३५ लाख १६ हजार ९९७
- एकूण मृत्यू : २ लाख ७४ हजार ३९०
- करोना लसीचे डोस दिले गेले : १८ कोटी २९ लाख २६ हजार ४६०