Covid19: देशात २४ तासांत ३ लाख ६८ हजार १४७ रुग्ण दाखल, ३४१७ मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 3, 2021

Covid19: देशात २४ तासांत ३ लाख ६८ हजार १४७ रुग्ण दाखल, ३४१७ मृत्यू

https://ift.tt/3eeoPpg
नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात रविवारी (२ एप्रिल २०२१) रोजी एकूण ३ लाख ६८ हजार १४७ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३४१७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल ३ लाख ०० हजार ७३२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालायकडून देण्यात आलीय. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ९९ लाख २५ हजार ६०४ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख १८ हजार ९५९ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३४ लाख १३ हजार ६४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.
  • एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ९९ लाख २५ हजार ६०४
  • एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ६२ लाख ९३ हजार ००३
  • उपचार सुरू : ३४ लाख १३ हजार ६४२
  • एकूण मृत्यू : २ लाख १८ हजार ९५९
  • करोना लसीचे डोस दिले गेले : १५ कोटी ७१ लाख ९८ हजार २०७
देशात लसीकरण मोहीमही सुरू आहे. गेल्या २४ तासांत १२ लाख १० हजार ३४७ जणांना लसीचा डोस देण्यात आलाय. अधिक वाचा :