मुंबई: चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या आहेत. तसेच आणि विशेषत: रत्नागिरीतील सुमारे १०४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला हे वादळ थेट धडकरणार नसले तरी कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. ( at of maharashtra latest live update) Live अपडेट... >> नाशिक : नाशिकमध्ये पहाटे शहरातील काही भागात पावसाचा शिडकावा झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सकाळी साडेआठपर्यत फक्त ०.१ मिमी पावसाची नोंद झाली. आर्द्रता ६६ टक्के, तर किमान तापमान २५.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. >> सांगली जिल्ह्यात काल दुपारपासून जोरदार वा-यासह पावसाला सुरूवात झाली होती. अनेक ठिकाणी रविवारी सकाळीही पावसाची रिपरिप सुरूच आहे. जोरदार वा-यामुळे झाडे पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विजेचे खांब कोसळल्याने जिल्ह्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. वादळाचा परिणाम आजही दिसत आहे. >> अलिबाग: रायगड जिल्ह्याच्या जवळून जाणार, हवामान खात्याचा अंदाज. >> कोल्हापूर जिल्ह्यालाही तौत्के चक्रिवादळाचा फटका, इचलकरंजीत रात्रीपासून मुसळधार पाऊस >> रत्नागिरीतील एकूण १०४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. >> रत्नागिरीत पावसाच्या हलक्या सरी. >> सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याच्या वारा अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित >> मुंबईतील विविध ठिकाणच्या करोना बाधित रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले. >> शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी. >> मुंबईतील मुलुंडमध्ये काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित. >> मुंबईत जाणवला तौत्के चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी.