नवी दिल्ली: आयपीएलचा १४वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. सुरक्षित अशा बायो बबलमध्ये असलेल्या खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने ही स्पर्धा चार मे रोजी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. वाचा- मध्ये २९ लढती झाल्या असून अद्याप ३१ लढती शिल्लक आहेत. आयपीएलच्या बायो बबलमध्ये करोना झाल्यावरून बीसीसीआय आणि एकूणच व्यवस्थापनावर टीका होत असताना एक नवी माहिती समोर येत आहे. आयपीएलचा १४वा हंगाम सुरू होण्याआधी अनेक खेळाडूंनी करोनाची लस घेण्यास नकार दिला होता. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा सर्व आठ संघांना करोनाची लस घेण्यास सांगण्यात आले तेव्हा अनेक खेळाडूंनी त्याला नकार दिला होता. ही कोणत्याही प्रकारची चूक नव्हती, तर पुरेशी जागरुकता नव्हती. वृत्तानुसार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना या संदर्भात फार कमी माहिती होती. वाचा- TOIने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंना वाटले की ते बायो बबलमध्ये सुरक्षित असतील आणि लस घेण्याची गरज नाही. याबाबत संघ व्यवस्थापनांकडून देखील दबाव टाकला गेला नाही. पण त्यानंतर अचानकपणे सर्व गोष्टी हाताबाहेर गेल्या. आयपीपीएल स्थगित झाल्यानंतर घेतली लस वाचा- आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित झाल्यानंतर अनेक भारतीय खेळाडूंनी करोनाची लस घेतली. भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने करोनाची पहिली लस घेतली. त्यानंतर विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, दीपक चहर आदी क्रिकेटपटूंनी लस घेतली आहे.