Photos- लॉस एंजेलिसमध्येही आहे सनी लिओनीचं आलिशान घर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 16, 2021

Photos- लॉस एंजेलिसमध्येही आहे सनी लिओनीचं आलिशान घर

https://ift.tt/3uSXkYm
मुंबई- करणजीत कौर म्हणजेच आज बॉलिवूड प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. आपल्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणाऱ्या सनीचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला होता. सनीचं कुटुंब कॅलिफोर्नियाला शिफ्ट झाल्याने सनीही त्यांच्यासोबत परदेशी गेली. तिथेच सनीने पॉर्न इण्डस्ट्रीमध्ये काम करणं सुरू केलं. परंतु, त्यानंतर सनीने बॉलिवूड पदार्पण करत सगळ्यांचीच मन जिंकून घेतली. 'जिस्म २' चित्रपटातून अभिनयाची सुरुवात करणारी सनी आज कोट्यवधींची मालकीण आहे. मुंबईप्रमाणे लॉस एंजेलिसमध्येही सनीचं आलिशान घर आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस परिसरात सनीचा एक आलिशान बंगला आहे. हा बंगला एक एकर परिसरात पसरलेला आहे. एवढया मोठ्या जागेत असणाऱ्या या बंगल्यामध्ये फक्त पाच बेडरूम आहेत. सनीचं घर अमेरिकेतील सगळ्यात महागड्या जागांमधील एक असलेल्या बेवर्ली हिल्स येथे आहे. सनीच्या घरातून खूप सुंदर निसर्ग दिसतो. या घरातील सजावटीच्या वस्तू सनीने इटली, रोम आणि स्पेनमधून आणल्या आहेत. परदेशातून आणलेल्या वस्तुंनी हे घर सजलेलं आहे. त्यामुळे घराला लक्झरियस लुक येतो. सनी आपला जास्तीत जास्त वेळ याच ठिकाणी घालवते. सनी तिच्या घराचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यात ती पती आणि मुलांसोबत असते. याशिवाय मुंबईतील जुहू परिसरात सनी आणि डॅनियल यांचं स्वतःचं घर आहे. जुहूमध्ये घर घेण्यापूर्वी सनी अभिनेत्री सेलिना जेटलीच्या घरात भाड्याने राहत होती. परंतु, घरात स्वच्छता न ठेवल्यामुळे सेलिनाने सनीला घरातून काढून टाकलं होतं. त्यानंतर सनीने मुंबईतील जुहूमध्ये १६ कोटींचं घर घेतलं होतं. सनीला आपल्या घरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून फोटो काढणं प्रचंड पसंत आहे. कधी ती तिच्या बेडरूममधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते तर कधी बाथरूममध्ये फोटोसाठी पोज देताना दिसते.