भारताने करोनाबाधितांचे, मृतांचे खरे आकडे द्यावेत: WHO - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 11, 2021

भारताने करोनाबाधितांचे, मृतांचे खरे आकडे द्यावेत: WHO

https://ift.tt/2SIdVzS
जिनिव्हा: भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. भारतातील करोना परिस्थितीवर इतर देशांसह जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेवून आहेत. भारतात करोनामुळे होणारे बाधित आणि मृतांची संख्या चिंताजनक असून भारत सरकारने करोनाबाधितांची खरी आकेडवारी समोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी म्हटले की, इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्यूशन (IHME) यांनी ऑगस्टपर्यंत भारतात १० लाख करोनाबाधितांचा मृत्यू होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सध्या भारताची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. भारतातील करोनाबाधित आणि मृतांची संख्या ही दक्षिण-पूर्व भागातील देशांपेक्षाही अधिक आहे. भारताने आणि जगातील इतर देशांनीही करोनाबाधितांची आणि मृतांचा खरा आकडा जाहीर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. वाचा: वाचा: भारतात आढळलेला करोना विषाणूचा वेरिएंट अधिक जलदपणे फैलावत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी म्हटले. भारतात आढळलेला B.1.617 हा वेरिएंट जागतिक चिंतेचा विषय आहे. अशा प्रकारचा हा चौथा वेरिएंट असल्याचे डॉ. स्वामीनाथन यांनी म्हटले. वाचा: वॅक्सीन पासपोर्टची अट नकोच प्रवास करण्यासाठी वॅक्सीन पासपोर्टची पूर्वअट असू नये असे आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमनाच्या (आयएचआर) आढावा बैठकीत नमूद करण्यात आले असल्याचे डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले. करोना प्रतिबंधक लस घेतली म्हणून आपल्याला संसर्ग होणार नाही, असा समज करता येणार नाही. लशीमुळे करोनामुळे गंभीर आजारी होण्याचा धोका कमी झाला आहे. मात्र, लस घेतलेल्या व्यक्तीमुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.