पुन्हा दरवाढीचा झटका; पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या आजचा भाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 9, 2021

पुन्हा दरवाढीचा झटका; पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या आजचा भाव

https://ift.tt/3x6rQyz
मुंबई : एक दिवस विश्रांतीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पुन्हा एकदा दरवाढ केली. आज देशभरात पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल २५ पैशांनी महागले. या दरवाढीने ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे. या दरवाढीनंतर आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०१.७६ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.५६ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९६.९४ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९५.५२ रुपये आहे. आज मुंबईत डिझेलचा भाव ९३.८५ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८६.४७ रुपये आहे. चेन्नईत ९१.१५ रुपये आणि कोलकात्यात ८९.३२ रुपये डिझेलचा भाव आहे. राजस्थानातील श्री गंगानगर येथे देशातील सर्वात महागडे डिझेल मिळत आहे. येथे डिझेलचा भाव ९९.४९ रुपये झाला आहे. शंभरीच्या उंबरठ्यावर डिझेल पोहोचले आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीनंतर कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत २२ वेळा कंपन्यांनी दरवाढ केली आहे. यात डिझेल दरात एकूण ५.६९ रुपयांची वाढ झाली आहे. तर पेट्रोल ५.२४ रुपयांनी महागले आहे. पेट्रोलने जवळपास सहा राज्यांमध्ये शंभरी गाठल्यानंतर डिझेलचीसुद्धा त्यादिशेने वाटचाल सुरु झाली आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या इंधन दरवाढीत पेट्रोलच्या तुलनेत डिझेल अधिक महागले आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. मंगळवारी सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ०.७३ डाॅलरने वधारला आणि ७२.२२ डाॅलर झाला. सलग चौथ्या आठवड्यात तेलाचा भाव वाढला आहे. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.८२ डॉलरने वधारला आणि ७०.०५ डॉलर प्रती बॅरल झाला.