नागपूर: संपूर्ण जिल्ह्यात संसर्गासोबतच मृत्यूचा हाहाकार माजविलेली संसर्गाची दुसरी लाट आता पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. सोमवारी सलग सातव्या दिवशी अर्ध्या टक्क्याच्या खाली राहिला तर गेल्या २४ तासांत करोनाने एकही रुग्ण दगावला नाही. आज दिवसभरात विषाणूचा संसर्ग झाल्याच्या शक्यतेतून तपासलेल्या ४६९४ जणांपैकी जेमतेम २४ जणांना कोविडची बाधा झाल्याचे निदान करण्यात आले. ( ) वाचा: नागपूर जिल्ह्यातून आज दिवसभरात ५४ कोरोनाग्रस्त लक्षणांची साखळी भेदून रुग्णालयातून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात आजवर बाधा झालेल्या ४ लाख ७७ हजार ८ जणांपैकी ४ लाख ६७ हजार ५८७ जणांनी विषाणूशी झुंज देत त्याला परतवून लावले आहे. आजारमुक्तीची ही सरासरी आता ९८ टक्क्यांवर स्थिरावली आहे. वाचा: आज पॉझिटिव्ह आलेल्या २४ जणांमुळे जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत ३९६ अॅक्टिव्ह बाधितांवर विविध मध्ये उपचार केले जात आहेत. त्यातील ७३ अॅक्टिव्ह बाधित जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर ३२३ बाधित महापालिकेच्या हद्दीतील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. नागपुरातील २४ तासांतील स्थिती पॉझिटिव्ह- २४ तपासलेले नमुने- ४६९४ आजचे आजारमुक्त- ५४ आजचे मृत्यू- ० अॅक्टिव्ह बाधित- ३९६ वाचा: