'पश्चिम बंगालचे राज्यपाल भ्रष्ट, कोट्यवधींच्या जैन हवाला कांडातील आरोपी' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 29, 2021

'पश्चिम बंगालचे राज्यपाल भ्रष्ट, कोट्यवधींच्या जैन हवाला कांडातील आरोपी'

https://ift.tt/3quYKXH
कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद रंगला आहे. मुख्यमंत्री ( ) यांनी राज्यपाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यपाल जगदीप धनखड ( ) हे एक भ्रष्ट व्यक्ती आहेत. मुंबईतील १९९६ च्या जैन हवाला कांडात ( hawala jain case ) धनखड हे आरोपी होते. यामुळे त्यांना हटवण्यासाठी आपण केंद्राकडे तीन वेळा पत्र लिहिले आहे, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममतांनी केलेल्या आरोपांना काही वेळातच राज्यपाल धनखड यांनी प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्यावर जाहीपणे काही गंभीर आरोप केले आहेत. हे दुर्दैवी आहे. सनसनाटी आरोप करण्यासाठी त्या इतकी मोठी चुकीची माहिती देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. कुठल्याही आरोपपत्रात आपले नाव नाहीए. असे कुठलेही कागदपत्र नाहीए. ही अतिशय चुकीची माहित आहे. हवाला आरोप प्रकरणी आपण कोर्टाकडून कुठलीही स्थिगिती मिळवलेली नाही. कारण असे कुठलेच आरोपपत्र नव्हते, असं जगदीप धनखड यांनी स्पष्ट केलं. यशवंत सिन्हांचे नाव आरोपपत्रात होते, त्यांच्याशी बोला ममतांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. जैन हवाला कांडात आपण दोषी नाही. आपण ममता बनर्जींना छोट्या बहीण मानतो. पण त्यांनी जे काही आरोप केले ते सत्याच्या पलिकडे आहेत. यशवंत सिन्हांचे नाव जैन हवाला कांड प्रकरणी आरोपपत्रात होते. यामुळे ममता बॅनर्जींनी त्यांना या प्रकरणी विचारलं पाहिजे. सर्व घटनात्मक संस्थांना संपण्यासाठी ममतांना जनादेश मिळाला आहे का? त्यांना अशी परवानगी मिळू शकणार नाही, असं राज्यपाल धनखड म्हणाले. निवडणुकीपासून आरोप प्रत्यारोप सुरू पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपासून ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणुकीनंतर राज्यात उसळलेल्या हिंसाचारावरून राज्यपाल धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना टीकेचं लक्ष्य केलं होतं. हिंसाचाराला ममताच जबाबदार असल्याचं धनखड म्हणाले. तर नाराज ममतांनी १४ पानांचे पत्र लिहिले होते. सत्ता हडपण्याच्या प्रयत्नांपासून दूर व्हा, असं उत्तर ममतांनी दिलं होतं.