लग्नानंतर रोहित शर्माने केली होती मोठी चूक; पाहा विराटने कसा घेतला फायदा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 10, 2021

लग्नानंतर रोहित शर्माने केली होती मोठी चूक; पाहा विराटने कसा घेतला फायदा

https://ift.tt/3iuZNER
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माने डिसेंबर २०१५ साली रीतीका सजदेह सोबत विवाह केला. क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच वैवाहिक आयुष्यात काही गोष्टीची सवय लागण्यास वेळ लागतो. याला अपवाद भारताचा मर्यादित षटकाचा कर्णधार देखील नाही. वाचा- रोहित शर्माला गोष्टी विसरण्याची सवय आहे. क्रिकेट दौऱ्यावर असताना तो अनेक वेळा गोष्टी विसरत असतो. हातातील घड्याळ, आयफोन, आयपॅड आणि पासपोर्ट सारख्या गोष्टी रोहित हॉटेल रुममध्ये विसरतो. ही गोष्ट अन्य कोणी नाही तर भारताचा कर्णधार याने सांगितली. वाचा- रोहितने स्वत:कडील अनेक गोष्टी विसरल्या आहेत. पण लग्न झाल्यानंतर त्याने एक महत्त्वाची गोष्ट हॉटेल रुममध्ये विसरली होती. रोहितने लग्नातील अंगठी रुममध्ये विसरली. यासंदर्भात रोहितला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, मी नवविवाहीत होतो आणि विमान पकडण्याच्या घाइत ही चूक झाली होती. नुकतेच लग्न झाल्याने मला अंगठी घालण्याची सवय नव्हती. सकाळी बोटात घालू म्हणून रात्री झोपताना मी अंगठी काढून ठेवली. त्यानंतर जेव्हा सकाळी उठून घाईत टीमच्या बसमध्ये बसलो तेव्हा अंगठी हॉटेल रुममध्ये विसरल्याचे लक्षात आले. वाचा- मी जेव्हा बसमध्ये पोहोचलो तेव्हा उमेश यादवच्या हातात अंगठी पाहून लक्षात आले की मी हॉटल रुममध्ये अंगठी विसरली आहे. अंगठी परत मिळवण्यासाठी मी हरभजन सिंगची मदत घेतली. हॉटेलमधील एक व्यक्ती भज्जीच्या ओळखीचा होता. त्यामुळे मी त्याला विनंती केली. ही गोष्ट संघातील अन्य लोकांना कळाली आणि विराट कोहलीने ती सर्वांपर्यंत पोहोचवून मोठी बातमी केली. वाचा- एका शोमध्ये बोलताना रोहितने सांगितले की, मी टीममधील सहकाऱ्यांना नेहमी सांगत असतो की, सराव असो की विमानतळावर जाण्याआधी मला एकदा फोन करा किंवा रुमवर येऊन मला हाक मारा. पण त्या दिवशी तसे झाले नाही आणि मला उशिर झाला. वाचा-