नवी दिल्ली : देशातील संक्रमणाचा दर घसरत असतानाच देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० लाखांहून कमी झालीय. तर सलग गेल्या सात दिवसांपासून एक लाखांहून कमी आहे, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (१३ जून २०२१) ७० हजार ४२१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या ७२ दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी दर ४.७१ टक्के आहे. सलग सातव्या दिवशी हा दर पाच टक्यांच्या खाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ३९२१ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी १ लाख १९ हजार ५०१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९५ लाख १० हजार ४१० वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ८१ लाख ६२ हजार ९४७ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या ९ लाख ७३ हजार १५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ७४ हजार ३०५ वर पोहचलीय.
- एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ९५ लाख १० हजार ४१०
- एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ८१ लाख ६२ हजार ९४७
- उपचार सुरू : ९ लाख ७३ हजार १५८
- : ३ लाख ७४ हजार ३०५
- करोना लसीचे डोस दिले गेले : २५ कोटी ४८ लाख ४९ हजार ३०१