आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान झुकले; कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 11, 2021

आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान झुकले; कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा

https://ift.tt/3zmpbmb
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले भारतीय नागरीक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावासमोर झुकत पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने कुलभूषण जाधव यांना वरिष्ठ कोर्टात अपील करण्याची मंजुरी देणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. लष्करी कोर्टाने कुलभूषण जाधव यांना एका बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. कुलभूषण जाधव यांना या शिक्षेविरोधात अपील करण्याचाही अधिकार नव्हता. या मुद्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला फटकारले होते. नॅशनल असेंब्लीने मंजूर केलेल्या विधेयकानुसार, आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मृत्यूदंडाच्या शिक्षेची समीक्षा करणे आणि शिक्षेबाबत पुनर्विचार करण्यासाठीचे अधिक अधिकार देण्यात आले आहेत. कुलभूषण जाधव यांना शिक्षेविरोधात पाकिस्तानमधील वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची संधी मिळणार आहे. त्याच वेळेस त्यांना पुन्हा भारतात पाठवण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. वाचा: कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते भारतातील 'रॉ'साठी काम करीत असल्याचा दावा पाकिस्ताने केला होता. कुलभूषण जाधव हे पाकमध्ये हेरगिरी करीत होते, असा आरोपही पाकने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे होते. वाचा: वाचा: पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने एप्रिल २०१७ मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाची कलमे लावून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. पाकमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले होते. तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आंतरराष्ट्रीय न्यायलयाने फाशीला स्थगिती दिली होती. या प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये, असे न्यायालयाने पाकला बजावले होते.