फडणवीसांच्या कोथळी भेटीविषयी रक्षा खडसेंचा मोठा खुलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 2, 2021

फडणवीसांच्या कोथळी भेटीविषयी रक्षा खडसेंचा मोठा खुलासा

https://ift.tt/3g6bbnO
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते () यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ekanth Khadse) यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. तिथं भाजपच्या खासदार (Raksha Khadse) व अन्य कार्यकर्त्यांची फडणवीसांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान खडसे कुठेही दिसले नाहीत. मात्र, रक्षा खडसे यांनी याबाबत वेगळी माहिती दिली आहे. नाथाभाऊंचं फडणवीसांशी बोलणं झाल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागला, असा आरोप खडसे यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. फडणवीस यांच्यावर टीकेची एकही संधी खडसे सोडत नाहीत. अशा परिस्थितीत फडणवीस यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. वाचा: 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी महत्त्वाची माहिती दिली. 'फडणवीस हे पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते अशातला भाग नाही. यापूर्वीही ते घरी आले आहेत. आमच्या कुटुंबीयांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे. त्यामुळं नाथाभाऊंचही त्यांच्याशी बोलणं झालं,' असं रक्षा खडसे म्हणाल्या. 'मी भाजपची खासदार आहे. माझ्या पक्षाचे नेते मतदारसंघात आल्यानंतर त्यांना घरी बोलवणं, चहापाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे. ते मी केलं. यावेळी कार्यकर्त्यांच्याही भेटी झाल्या,' असं त्या म्हणाल्या. खडसेंच्या कोथली येथील घरात असलेल्या कमळाच्या चिन्हाच्या घड्याळाबद्दल विचारलं असता रक्षा खडसे म्हणाल्या, 'नाथाभाऊ आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत हे खरं आहे. पण, ते पूर्वी भाजपमध्ये होते. तेव्हापासूनच्या या वस्तू आहेत.' वाचा: