WHO ने सांगितले, करोनाचा 'हा' एकच स्ट्रेन धोकादायक! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 2, 2021

WHO ने सांगितले, करोनाचा 'हा' एकच स्ट्रेन धोकादायक!

https://ift.tt/34FnMt2
जिनेव्हा: करोनाच्या संसर्गाने हैराण झालेल्या जगासाठी आणि विशेषत: भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात आढळलेला वेरिएंट 'डेल्टा'चा फक्त एकच स्ट्रेन चिंतेचे कारण असून इतर दोन स्ट्रेनचा धोका कमी झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. करोनाच्या या वेरिएंटला B.1.617 असे ओळखले जाते. या वेरिएंटमुळेच भारतात मोठ्या प्रमाणावर करोनाचा संसर्ग फैलावला असल्याचे म्हटले जाते. हा ट्रिपल म्यूटेंट वेरिएंट आहे. मागील महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या या वेरिएंटच्या संपूर्ण स्ट्रेनला 'वेरिएंट ऑफ कन्सर्न' म्हणजेच चिंता करण्याजोगा वेरिएंट म्हटले होते. सध्या, सार्वजनिक आरोग्यासाठी B.1.617.2 हा स्ट्रेन धोकादायक आहे. इतर दोन स्ट्रेनच्या संसर्गाचा दर कमी झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, करोनाच्या B.1.617 हा प्रकाराला जागतिक पातळीवर 'भारतीय व्हेरियंट' म्हटलं गेल्यानंतर भारतानं १२ मे रोजी याला आक्षेप घेतला होता. विषाणूच्या कोणताही करोना स्ट्रेन / व्हेरियंट कोणत्याही देशाच्या नावाने ओळखला जाऊ नये, असे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले. सर्वप्रथम भारतात आढळलेल्या करोना व्हेरियंट B.1.617 या विषाणूच्या प्रकाराला 'डेल्टा व्हेरियंट' (Delta Variant) असं नाव देण्यात आले आहे. या नव्या नामकरणामुळे करोना विषाणूच्या सध्याच्या वैज्ञानिक नावांत बदल होणार नाही. कारण ते वैज्ञानिक तथ्य आणि शोधावर आधारित आहेत. परंतु, कोणत्याही प्रकारच्या स्ट्रेनसाठी एखाद्या देशाला ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ नये यासाठी त्यांचं नामकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड १९ तांत्रिक प्रमुख डॉ. मारिया वान केरखोवे यांनी म्हटले.