अल्पवयीन मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 21, 2021

अल्पवयीन मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर

https://ift.tt/3wO6mH8
अकोला : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे राज्यभर लॉकडाऊन होतं. पण तरीदेखील गुन्ह्यांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अकोल्यामध्ये हत्येचा एक भयंकर प्रकार समोर आला आहे. एका 17 वर्षीय मुलाची त्याच्याच अल्पवयीन मित्रानं हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मारेकरी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलाची चौकशी केली असता अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. हत्येचा उलगडा झाल्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. अकोला शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरात ३ दिवसांपूर्वी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून होता. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंदही केली. पण चौकशीमध्ये मुलाची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या रूममध्ये राहणाऱ्या मित्राची चौकशी केली असता त्यानंचं ही हत्या केल्याचं सांगितलं. मृतक मुलगा अन् मारेकरी मुलगा हे दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील असून ते शिक्षणासाठी अकोल्यात आले होते. दरम्यान, दोघांमध्ये नेमका कसा वाद झाला आणि कशा प्रकारे मुलाची हत्या करण्यात आली याची चौकशी सध्या पोलीस करत आहे. पण मित्रानेच मित्राची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.