आश्चर्य! टाळ्या वाजवताच 'इथे' निघतात पाण्यातून बुडबुडे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 28, 2021

आश्चर्य! टाळ्या वाजवताच 'इथे' निघतात पाण्यातून बुडबुडे

https://ift.tt/3qwgAJH
जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल या गावात टाळ्यांच्या आवाज केल्यास जलकुंडातून पाण्याचे बुडबुडे बाहेर येतात. यामागील शास्त्रीय कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या जलकुंडांना भेट देऊन टाळ्यांचा आवाज करून बुडबुडे पाहण्यासाठी एकच गर्दी केली जात आहे. वाचा: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या वेंकटापूर या गावात वेंकटेश्वर स्वामींचे देवस्थान आहे. प्राणहिता नदीच्या काठावर वसलेल्या या गावात वर्षभर भक्तांची मांदियाळी असते. या ठिकाणी लग्न समारंभ, नवस आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने केले जातात. झाडाच्या खोडात देवाची मूर्ती असून पावसाळ्यात चारही बाजूला पाणी साचते. मात्र, मंदिरात पाणी शिरत नाही हे विशेष. खासकरून रविवारच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. वाचा: वेंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्यावर भाविक लगतच्या जंगलात असलेल्या जलकुंडांना भेट देऊन निसर्गाच्या अनोख्या अविष्काराचा अनुभव घेतात. पुरातन काळापासून या ठिकाणी जलकुंड असून बाराही महिने यामध्ये पाणी साचलेले असते. एकूणच वेंकटापूर हे श्रद्धेचं ठिकाण असल्याने बाराही महिने इथे गर्दी असते. येथे टाळ्यांचा आवाज केल्याने जलकुंडातील पाण्यातून बुडबुडे बाहेर येतात. हे असे का होते, यामागील शास्त्रीय कारण कोणालाही सांगता येत नाही. श्रद्धाळू लोक या अनोख्या गोष्टीकडे ईश्वराची किमया म्हणून पाहतात. वाचा: