Vidoe- दीपिका कक्कर प्रेग्नन्ट? शोएब इब्राहिमनं सांगितलं सत्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 28, 2021

Vidoe- दीपिका कक्कर प्रेग्नन्ट? शोएब इब्राहिमनं सांगितलं सत्य

https://ift.tt/3dmHpux
मुंबई: टीव्ही अभिनेत्री प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. अनेक चाहते दीपिकाला शुभेच्छा देताना दिसत आहेत. एवढंच नाही तर अनेक नातेवाईकही दीपिका आणि शोएब यांना प्रश्न विचारत आहेत की, खरंच दीपिका प्रेग्नन्ट आहे का? अशात शोएबनं नुकतंच चाहत्यांसाठी एक लाइव्ह सेशन घेतलं. या व्हिडीओमध्ये दीपिका आणि शोएबनं तिच्या प्रेग्नन्सीबद्दल होत असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. युट्यूबवर घेतलेल्या या लाइव्ह सेशनमध्ये शोएब आणि दीपिकानं कशाप्रकारे नातेवाईक या दोघांना प्रेग्नन्सीसाठी शुभेच्छा देत आहेत हे सांगितलं. चाहत्यांसोबतच या दोघांचे जवळचे नातेवाईकही फोन करून त्यांना याबाबत विचारत असल्याचंही या दोघांनी सांगितलं. यासोबतच हे दोघंही ही बातमी लपवत असल्याची तक्रार करत आहेत. यामुळे त्रासलेल्या शोएब आणि दीपिकानं लाइव्ह सेशन घेत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगितलं आहे. आपल्या लाइव्ह सेशनमध्ये या चर्चांवर मौन सोडत शोएबनं पत्नी दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यासोबतच त्यानं आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे की, 'जेव्हा खरंच असं काही घडेल तेव्हा आम्ही दोघंही ही गोड बातमी सर्वांशी शेअर करू. आम्ही नेहमीच लहानात लहान गोष्ट आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतो. मग ही गोड बातमी आम्ही का लपवून ठेवू. कृपया अशाप्रकारच्या अफवा पसरवू नका.' दीपिका कक्कर आणि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ते त्यांच्या रोजच्या आयुष्यातील अनेक गोष्टी यावर शेअर करत असतात. दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती सध्या 'ससुराल सिमर का २'मध्ये काम करत आहे. या शोच्या पहिल्या सीझननं दीपिकाला स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली होती आणि शोएबसोबतही तिची पहिली भेट या मालिकेच्या सेटवर झाली होती.