अभिनेता करण मेहराला अटक, पत्नी निशाचा मारहाणीचा आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 1, 2021

अभिनेता करण मेहराला अटक, पत्नी निशाचा मारहाणीचा आरोप

https://ift.tt/2SLqXfO
मुंबई- अभिनेता आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याचे वृत्त वारंवार येत होते. आता पत्नी निशासोबत घरगुती हिंसाचार केल्याच्या आरोपाखाली करणला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सध्या करण गोरेगाव पोलीस ठाण्यात असून त्याचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, निशाने सोमवारी ३१ मे रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात करणविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. निशाने करणवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून करणला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे. करण आणि निशा यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे वृत्त वारंवार समोर येत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी निशाने करणशी कोणताही वाद नसल्याचं सांगत या सर्व बातमींना अफवा म्हटलं होतं. दरम्यान, टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये करण मेहरा मुख्य भूमिकेत दिसला होता. या मालिकेत करणबरोबर हिना खानही मुख्य भूमिकेत होती. याशिवाय करण 'बिग बॉस १०' आणि 'नच बलिये ५' मध्येही दिसला आहे. निशा रावलबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या शादी मुबारक या मालिकेत दिसत आहे. करण आणि निशाने २०१२ मध्ये लग्न केले होते आणि त्यांना चार वर्षांचा मुलगा कविश आहे.