ट्रकची बाईकला भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, १ जखमी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 13, 2021

ट्रकची बाईकला भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, १ जखमी

https://ift.tt/35hq0ik
नागपूर : नागपूर शहरात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कटोल रोडवर भरधाव वेगात असलेल्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून नऊ वर्षाच्या मुलास गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी यासंबंधी माहिती दिली. सतनामसिंग अंधरेले (वय 50) आणि त्यांची मेव्हणी मुन्नी कौर अंधरेले (वय 45) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या अपघातात सतनाम सिंगचा पुतण्या सुलिदर सिंग गंभीर जखमी झाला आहे. तिघे बाईकवरून परसोडी गावी जात असताना ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी निष्काळजीपणाने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले व ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमी सुलिदर सिंगवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघाताचा पोलीस पुढील तपास करत आहेत.